आष्टी परिसरात काॅंग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींच्या भेटीने कार्यकर्ते उत्साही


पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष

आष्टी परिसरात काॅंग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींच्या भेटीने कार्यकर्ते उत्साही

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी घेतली कार्यकर्त्यांची भेट 


चामोर्शी दि. ३१) : तालुक्यातील आष्टी - इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत काँग्रेस पार्टीची कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाना पसफूलवार यांचे निवास स्थान आष्टी येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी भेट देऊन परिसरातील समस्यांवर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काॅंग्रेसचे नेते मंडळी आष्टी परिसरातील काॅंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटी घेत समस्या जाणून घेत असल्याने कार्यकर्ते उत्साही असल्याचे दिसून येत आहेत. यावेळी आष्टी शहरातील काॅंग्रेसचे नाना पसफूलवार,वासुदेव खर्डीवार, तुकाराम तोरे,सत्यवान भडके, आनंद कांबळे, शंकर मारशेट्टिवार, आकीनवार, बंडू चापले, सेवानिवृत्त वनपाल पोतगंटिवार, मधुकर पुष्पलवार, सुरज, देवा बोरकुटे,यांच्यासह आष्टी परिसरातील काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments