काँग्रेस आष्टी - इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्राची ॲड. विश्वजीत कोवासे युवक काँग्रेस प्रदेश महासचिव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
चामोर्शी दि. ३०) : तालुक्यातील आष्टी - इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत काँग्रेस पार्टीची कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक कांग्रेस सचिव नाना पसफूलवार यांचे निवास स्थान आष्टी येथे ॲड. विश्वजीत कोवासे युवक काँग्रेस प्रदेश महासचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील समस्यांवर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बूथ कमेटीचा आढावा घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीकरीता जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक बूथवर क्रियाशील लोकांची कमेटी बनविणे कमिटीमध्ये महिला, युवक व सर्व घटकांच्या नवीन लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे मार्गदर्शन ॲड. विश्वजीत कोवासे युवक काँग्रेस प्रदेश महासचिव यांनी केले.
यावेळी आष्टी इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्रातील काॅंग्रेसचे नाना पसफूलवार,वासुदेव खर्डीवार, विजय बहिरेवार, सत्यवान भडके आनंद कांबळे, शंकर मारशेट्टिवार, विनोद येलमुले, आकीनवार, बंडू चापले, पोसगंटिवार, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment