*लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन कोनसरी लोह प्रकल्पतर्फे मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण*


*लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन कोनसरी लोह प्रकल्पतर्फे मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण*

आष्टी प्रतिनिधी 


बुधवार 10 जुलै 2024 रोजी लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशन कोनसरी कोनसरी लोह प्रकल्प सी.एस.आर विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोनसरीच्या इयत्ता 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी चंद्रशेखर राव वोरा CEO Pellet प्लांट,महादेव मडावी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, डी.एन.शिवणकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोनसरी), व इतर शिक्षक उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, इयत्ता 9वी ते 12वीच्या एकूण 137 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.

0/Post a Comment/Comments