वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांची तालुका न्यायालयास क्षेत्रभेट


वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांची तालुका न्यायालयास क्षेत्रभेट.

✍️आरमोरी - वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स, आरमोरी येथील वर्ग ८ वी च्या विध्यार्थ्यानी आस्थापना व न्यायालयीन प्रणाली यासंबंधी माहिती मिळावी यासाठी आरमोरी येथील न्यायालयास क्षेत्रभेट देण्यात आली .
विध्यार्थ्यांना न्यायालयाच्या कार्यप्रणालीची विस्तृत माहिती मिळावी व हि माहिती त्यांना दीर्घकाळ स्मरणात राहावी साठी हि क्षेत्रभेट आयोजित केली . याप्रसंगी विध्यार्थ्यानी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता स्वताची प्रश्नावली तयार केली होती, त्यामाध्यमातून विध्यार्थ्यांमध्ये असणार्या अनेक शंकाचे निराकरण झाले व प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे विध्यार्थी कशा प्रकारे जिज्ञासू असू शकतात याचीही जाणीव झाली.
न्यायालयाच्या वतीने विध्यार्थ्यांच्या या जीज्ञासुवृत्तीचे जाणीव ठेवून क्षेत्र भेटीच्या कार्यास सहकार्य मिळाले. हा कार्यक्रम (पर्यटन विभाग) प्रमुख श्री. रविकांत म्हस्के सर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला तसेच श्री. संदीप गणवीर सर यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी मा. श्री अजीत मडके साहेब , (न्यायाधीश) दिवाणी व फौजदारी न्यायालय आरमोरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच श्री. नारायन गारोले सहा. अधीक्षक , श्री विनोद सोरते , सौ वैशाली सोरते , सौ पुष्पा निनावे व श्रीकांत गरमळकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0/Post a Comment/Comments