*बेडगाव पोलिसांची कारवाई गोवंश तस्करी; 22 जनावरांना जीवदान*

जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची 
*बेडगाव पोलिसांची कारवाई गोवंश तस्करी; 22 जनावरांना जीवदान*
      
 *-जनावरांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त,*

*कोरची:-* दोन पिकअप वाहनांच्या सहाय्याने गुरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे बेडगाव पोलिसांनी नाकाबंदी करीत कत्तलीसाठी जाणारी 22 गायींसह दोन वाहने, असा एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा माल जप्त केला केला. सदर कारवाई गुरुवारी (दि. 1) बेडगाव बोरी टी-पॉईंटजवळ करण्यात आली. गोवंश तस्करी प्रकरणी अतिक बशीर शेख (वय 36, रा. गोठणगाव), हरीश मन्नू पाटोडी (वय 30) व हंसराज काशीराम मडावी (वय 23, दोघेही रा. जांभूळखेडा) आणि गुरुदेव उमराव बारई (वय 24, रा. गोठणगाव) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्यात गोवंश हत्या कायदा लागू होऊन कित्येक वर्ष झाली. मात्र, शासन, प्रशासन तसेच पोलिस विभाग कितीही गोवंश बंदीचे दावे करीत असलेतरी राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंशा तस्करी होत असल्याचे दिसून येते. कारण आल्यादिवशी राज्यात कुठे ना कुठे कारवाई होतच असते. अशीच कारवाई कोरची तालुका छत्तीसगड राज्य सीमेलगत असून, तालुक्यातून छत्तीसगड मार्गे मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत आली आहे. गुरुवारी तालुक्यातील बेडगाव परिसरातून दोन वाहनांच्या सहाय्याने गुरांची तस्करी होणार असल्याची माहिती बेडगाव पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे बोरी टी-पॉइंटजवळ बेडगाव पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान, एमएच 49 / एटी-1345 आणि एमएच 33 / टी- 2541 क्रमांकाची दोन वाहने संशयास्पद स्थितीत येताना दिसताच पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता दोन्ही वाहनात 22 गुरे बेकायदेशीररित्या बंदिस्त आढळून आली. पोलिसांनी कारवाई करीत गुरे तसेच दोन्ही पिकअप वाहन, असा एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी चार तस्करांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उदय पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुरुपवार यांच्यासह पथकाने पार पाडली.

0/Post a Comment/Comments