*लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात 'सुरक्षा' ढलाई*


*लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात 'सुरक्षा' ढलाई*


पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात दर महिण्याच्या एक तारखेला वरीष्ठ,जेष्ठ,स्थायी व अस्थायी कर्मचार्यांसबोत 'सुरक्षा' ढलाई बैठक आयोजित करण्यात येतात.
सर्वात प्रथम सर्व कर्मचारी एक हात समोर करुन सुरक्षा शपथेची प्रार्थना करतात.

सुरक्षा अधिकारी वरीष्ठ अधिकाऱ्याला समोर बोलवून जे कर्मचारी दर महिण्यातुन दोन निवडले जातात एकतर सुरक्षा हिरो,दुसरा महिन्याचा कर्मचारी हिरो दर महिण्यात कर्मचारी नियुक्त करताता त्यांना बक्षीस,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतात.

यावेळी लाइट्स मेटल्स नवनियुक्त वरीष्ठ प्रबंधक वायजीएस प्रसाद ८ जुलै सोमवार रोजी सहयोगी झाले,आणि त्या आज १ ऑगस्ट गुरुवार रोजी जेष्ठ,वरीष्ठ,स्थायी,अस्थायी सर्व कामगार,कर्मचाऱ्यांना 'सुरक्षा'ढलाई बाबत मार्गदर्शनातून सांगितले की,सुरक्षिततेला तुमचे सर्वोच्च प्राधान्य बनवा
कामाच्या ठिकाणी सुरक्षितता इतर सर्व गोष्टींच्या वर ठेवली पाहिजे: खर्च, उत्पादकता, अंतिम मुदत इ. तुमचे कर्मचारी ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे, प्रत्येक प्रकल्पात त्यांची सुरक्षा ही तुमची सर्वोच्च चिंता आहे हे त्यांना सिद्ध करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि विश्वास निर्माण करतो.
याप्रसंगी सर्व जेष्ठ,वरीष्ठ,स्थायी, अस्थायी,सुरक्षा अधिकारी कामगार,कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments