राहुल गांधींची सभागृहात जात विचारली, काॅंग्रेसची भाजपच्या विरोधात गडचिरोलीत निदर्शने


राहुल गांधींची सभागृहात जात विचारली, काॅंग्रेसची भाजपच्या विरोधात गडचिरोलीत निदर्शने

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात आंदोलन 



गडचिरोली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतुन आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकुरनी मा. खा. राहुलजी गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खा. अनुराग ठाकुरच्या निषेधार्थ गडचिरोली येथील गांधी चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात ०१ ऑगस्टला आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष, शंकर पाटील सालोटकर, राजेश ठाकुर, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नितेश राठोड, हनुमंत मडावी आदिवासी जिल्हा अध्यक्ष, जीवन पाटील नाट, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, कल्पना नंदेश्वर तालुका अध्यक्षा, वामन सावसागडे, प्रमोद भाऊ वैद्य माजी नगराध्यक्ष, नामदेव मंडलवार अध्यक्ष रोजगार सेल, मंगला कोवे आरमोरी महिला तालुकाध्यक्ष, प्रभाकर वासेकर कोषाध्यक्ष, नंदू नरोटे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, घनश्याम वाढई महासचिव, रजनीकांत मोरघरे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, भैय्याजी मुद्दमवार पंचायत सेल, रमेश भाऊ चौधरी माजी नगरसेवक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, पुष्पलता कुमरे कार्याध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार, सुनील भाऊ डोगरा माजी शहर अध्यक्ष, अब्दुल भाई पंजेवानी अध्यक्ष सहकार सेल, शालिकराम पात्रे यांच्यासह जिल्ह्यातील काॅंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments