विद्यार्थ्यांना नोटबुक भेट एक स्तुत्य उपक्रम ; सामाजिक कार्यकर्ते मधुकर पुष्पलवार यांचे प्रतिपादन


विद्यार्थ्यांना नोटबुक भेट एक स्तुत्य उपक्रम ; सामाजिक कार्यकर्ते मधुकर पुष्पलवार यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र प्रदेश युवा काॅंग्रेस सचिव ॲड. विश्वजीत कोवासे यांचा सामाजिक उपक्रम

आष्टी: अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवा काॅंग्रेस सचिव एड विश्वजीत कोवासे यांनी विद्यार्थ्यांचे आपण कुणी देणं लागतो या भावनेने चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नोटबुक भेट दिले हा स्तुत्य उपक्रम असे उद्गार नुकतेच कुनघाडा माल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित नोटबुक वितरण कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मधुकर पुष्पलवार यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक शामराव कन्नाके, वसंत बाकमवार, भिमराव गौरालवार, पुरुषोत्तम चिंतमवार,विस्तारी पाटील बोलगोडवार, रामण्णा चिंतमवार उपस्थित होते

0/Post a Comment/Comments