*पारबताबाई विद्यालयात महावाचन उत्सव साजरा*


*पारबताबाई विद्यालयात महावाचन उत्सव साजरा*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

              कोरची येथील स्थानिक पारबताबाई विद्यालय येथे महावाचन उत्सव साजरा करण्यात आला. सदर उत्सवाच्या मुख्य उद्देश, वाचन हे ज्ञान आणि नवनिर्मितीचे मूळ बीज आहे. तथा वाचन हे आनंदासाठी आणि मनाच्या विकासासाठी आवश्यक आहे. आणि जगातील प्रत्येक व्यक्ती हा वाचक असतो. , त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्याची सवय वृद्धिंगत व्हावी. त्या माध्यमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने महावाचन उत्सव साजरा करण्यात आला. या शाळेत विद्यार्थ्यांची ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयात पुस्तके आहेत. सदर उत्सवाकरिता शाळेतील मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक वसंत गुरनुले, सुरज हेमके,तुळशीराम कराडे, कृष्णामाई खुणे, जीवन भैसारे ,निर्मला मडावी ,टीना चौधरी यांनी नेतृत्व केले. 
       या शाळेतील शिकणाऱ्या पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सवात सहभाग घेतला होता. तसेच प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी दुपारी तीन ते पाच पर्यंत महावाचन कार्यक्रम घेतला जातो. यावेळी प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक सुपर विजन म्हणून काम करतात. कोणते पुस्तक निवडायचे? कोणती पुस्तके बोध घेण्यासाठी आहेत? याची निवड करण्यासाठी वर्गशिक्षक त्यांना सहकार्य करतात. अशाप्रकारे महावाचन कार्यक्रम शाळेत नियमित राबविला जात आहे. सदर कार्यक्रमाकरिता शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी पराग खरवडे, मुंशीलाल अंबादे, कैलास अंबादे, प्रल्हाद बागडेरिया आदिने सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments