*बदलापुर आनी आरमोरी येथील युवती सोबत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी चे निषेध आंदोलन*


*बदलापुर आनी आरमोरी येथील युवती सोबत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी चे निषेध आंदोलन*
🖋ताहिर शेख🔸 २४/०८/२०२४ कुरखेडा:- बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर व आरमोरी येथील एका मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि महिला सुरक्षा विरोधात शांतीपूर्वक महायुति सरकार विरोधात व गृह मंत्री यांच्या राजीनाम्याचि नारेबाजी करीत, व आरोपीना फासी ची व्हावी अशी घोषणा देत निदर्शन महाविकास आघाडी तालुका कुरखेडा च्या वतीने करण्यात आले
आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्ट मध्ये सुनावणी करून आरोपींना फाशी देण्यात यावी आणि पीडितांना न्याय देण्यात यावे. तसेच यानंतर अशा प्रकारचे कृत्य होणारं नाही अशी तरतूद प्रशासनाने तयार करावी. अशी मागणी मवीआ चे नेते सुरेंद्र भाऊ चंदेल(शिवसेना उबाठ जिल्हाप्रमुख गडचिरोली जिल्हा), जीवन पाटील नाट तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी ता.कुरखेडा, अनीता ताई बोरकर नगर अध्यक्ष नगर पंचायत कुर., युसुफ भाई पठान कुरखेडा, यांनी केली तर या निषेध आंदोलन मध्ये माजी नगराध्यक्ष कुरखेडा ,डॉ महेंद्र भाऊ मोहबंसी, जयंत पा.हरडे जिल्हा उपाध्यक्ष कांग्रेस कमेटी, नगर सेविका आशाताई तुलावी, नगर सेवक आशीष भाऊ काळे, नगर सेविका हेमलता नंदेश्वर्, नगर सेविका कांताताई मट्ठे, माजी नगर सेवक उस्मान भाई पठान, आसिफ भाई, नगर सेवक जयेंद्र भाई चंदेल, अय्यूब भाई पठान, पुण्डलिक देशमुख, माजी पंचायत समिति सभापति गिरिधर तितराम, माजी जिल्हा प सदस्य प्रभाकर तुलावी, दशरथ लाळे, नगर सेवक अशोक कंगाली, भावेश मुंगनकर, प्रवीण खडसे, तुलशिराम पुरबांधे, मनोज सीडाम, अज्जु भाऊ सय्यद, पुरुषोत्तम तिरगम, विजु पा. खुणे, घीसु पा. खुणे, राकेश चव्हान, वैभव बन्सोड, सोनू भाऊ भट्टड, मोठ्या संख्येत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

0/Post a Comment/Comments