*कोरची येथे तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा*


*कोरची येथे तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

              कोरची येथे अखिल भारतीय राष्ट्रीय विज्ञान मेळावा अंतर्गत एक दिवसीय तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा श्रीराम विद्यालयात घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोरची केंद्राचे केंद्रप्रमुख हिराजी रामटेके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विनायक लिंगायत साधन व्यक्ती गट साधन केंद्र कोरची,प्रमोद वाढणकर, योगेश शुक्ला, प्रभाकर गेडाम,सुरज हेमके ,मनोज बनसोड ,किशोर ढवळे ,शितल टेंभुर्कर, के एम लंजे आदी उपस्थित होते. वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कोरचीचे अनिरुद्ध चांभारे होते.  
         सदर स्पर्धेच्या मुख्य विषय कृत्रिम बुद्धिमत्ता असून सदर स्पर्धेत तालुक्यातील बऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी व इंग्लिश भाषेचा वापर करून वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता.  
          सर्वप्रथम स्पर्धा घेताना लेखीपेपर घेण्यात आला होता. त्यानंतर सादरीकरण व वकृत्व घेण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. 
           कृत्रिम बुद्धीमता विषयी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अनिरुद्ध चांभारे यांनी सकल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता फायदे व तोटे सांगितले. 

            स्पर्धा झाल्यानंतर लगेच स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. सदर तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत धनंजय स्मृती विद्यालय बेतकाटीची विद्यार्थिनी अलिषा इरफान शेख वर्ग 8वीची हिने प्रथम क्रमांक तर जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री अंकालु बगवा वर्ग 9वी हिने द्वितीय क्रमांक पटकावीला. सदर दोन्ही विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेसाठी झालेली असून, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. 
           सदर कार्यक्रमाचे संचालन हेमंत भुसारी तर आभार सुरज हेमके यांनी मानले.

0/Post a Comment/Comments