*सर्वसामान्यांना वेठीस धरल्यास गुन्हे दाखल करा*


*सर्वसामान्यांना वेठीस धरल्यास गुन्हे दाखल करा*

*आढावा सभेत मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले स्पष्ट निर्देश*

सिरोंचा: तालुक्यातील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाले असून यापुढे सर्वसामान्यांना वेठीस धरल्यास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.

अहेरी,एटापल्ली आणि मुलचेरा नंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी शनिवार (१० ऑगस्ट) रोजी सिरोंचा तालुका मुख्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला.यावेळी तहसीलदार हमीद सय्यद,गटविकास अधिकारी अनिल पटले, मुख्याधिकारी जनक काडबाजीवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी,उपाध्यक्ष सत्यम पिडगू,माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार,माजी प स सभापती कृष्णमूर्ती रिक्कुला, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, सतीश भोगे,सतीश राचर्लावार,रंजित गागापूरपवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एम डी शानु, रवी सुलतान, रामकिष्टु नीलम, ओम प्रकाश ताटीकोंडावार,रमेश तोटा,देवय्या येनगंदुला,मदनय्या मादेशी,वेंकटलक्ष्मी आरवेली,समय्या तोकला,मणेश बोधनवार,नरेश संगरथी,सिद्धीक भाई आदी उपस्थित होते.

आढावा सभेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी करतानाच राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गती वाढविणे,पर्यायी वळण मार्ग मजबूत करणे,नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अनेक रस्ते वाहून गेले व पूल खचले असून त्वरित दुरुस्त करणे,एस टी महामंडळाचे बस पूर्ववत सुरू करणे,तालुका मुख्यालयातील भ्रमणध्वनी सेवा सुरळीत करणे, वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घेणे तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत द्या असे स्पष्ट निर्देश मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.एवढेच नव्हे तर आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला बालविकास प्रकल्पाने सजग राहून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी महसूल, कृषी व महिला बालविकास प्रकल्प तसेच आदी विभागाच्या वतीने मंत्री आत्राम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या आढावा सभेत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments