आष्टी येथील काॅंग्रेस प्रणित समर्थन असलेले सुरज कुकुडकर यांची दुसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड


आष्टी येथील काॅंग्रेस प्रणित समर्थन असलेले सुरज कुकुडकर यांची दुसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

आष्टी (प्रतिनिधी) : चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावच्या तंटा मुक्त समिती अध्यक्षपदी सुरज कुकुडकर यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. आष्टी गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसंदर्भात सभा 29 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या सभेत काॅंग्रेस प्रणित समर्थन सुरज कुकुडकर यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी एकमुखी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच बेबीताई बुरांडे, उपसरपंच सत्यशिल डोर्लीकर ग्रामसेवक मिसार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष नाना पसफूलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद कांबळे, शंकर मारशेट्टिवार, प्रेम गोडबोले, रोहन रायपूरे, सुरज दुर्गे, सुरज देवगडे, विनायक खोब्रागडे, गौरव अवथरे, पंकज येलमुले, सिद्धार्थ जिलेकर, अमोल क्षीरसागर आदी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments