*भवानीपुर येथे फुटबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन*


*भवानीपुर येथे फुटबॉल सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन*

  
         *स्व.जगदीश ढाली स्मूर्ती फुटबॉल क्लब भवानीपूर द्वारा फुटबॉल सामन्याचे आयोजन*

     *◆मूलचेरा◆* :तालुक्यातील भवानीपुर येथे दरवर्षी स्व.जगदीश ढाली यांच्या स्मूर्ती पित्यर्थ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात येते.आज या फुटबॉल सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.सामन्याच्या उदघाटन पूर्वी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्व.जगदीश ढाली यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.

       या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून रवींद्रनाथ टागोर हायस्कूल चे मुख्याध्यापक जुगल सरकार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून भवानीपूर ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय सरकार,जि.प. शाळेचे मुख्याध्यापक संजीत सरकार,ग्राप सदस्य रमेन सरकार,ग्राप सदस्या सौ कुश्मिता चॅटर्जी,ग्राप सदस्या सौ निभा मंडल,आविस नेते दिनेश बहाद्दूर,मंडल सर,बैरागी सर,वेलगूर ग्रामपंचायत चे उप सरपंच उमेशजी मोहुर्ले,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,संजय आक्केवार,माजी सरपंच विजय कुसनाके सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी फुटबॉल खेळाविषयी व स्वातंत्र्य दिनावर उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.फुटबॉल सामन्यासाठी एकूण तीन पुरस्कार ठेवण्यात आले.

        स्व.जगदीश ढाली स्मूर्ती फुटबॉल क्लब भवानीपूर द्वारा आयोजित फुटबॉल सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देबनाथ सर यांनी मानले.या फुटबॉल सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला सुंदरनगर,भगतनगर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.उदघाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दिनेश बहाद्दूर,विवेक हलदार, रमेन सरकार,सौरभ मजुमदार,गोपाल बिस्वास,संजीत सरकार,सूरज रॉय, बिस्वजित हलदार,कृष्णा रॉय,राजकुमार म्रीधा,अपूर्व चॅटर्जी, अभिजित गाईन सह स्व.जगदीश ढाली स्मूर्ती फुटबॉल क्लब भवानीपूर मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments