*कोरची तालुक्यात तीन इसमावर अस्वलीचा हल्ला*


*कोरची तालुक्यात तीन इसमावर अस्वलीचा हल्ला*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
                 कोरची तालुक्यापासून अंदाजे ४ किमी.असलेल्या बेडगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील क्षेत्रात
आज दिनांक 23.08.2024 रोजी सकाळी 8.00 वाजता मौजा गडेली आणि टेमली गावालगत असलेल्या कक्ष क्रमांक 456 मध्ये रानभाज्या तोडण्यासाठी गेले असता अस्वलने ३ लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गडेली व टेमली गावात जावून दोन्ही इसमांना शासकीय वाहनाव्दारे ग्रामीण रुग्णलय कोरची येथे औषध्योउपचाराकरीता भरती करण्यात आले. जखमी मध्ये नामे चम्मा पंडी नैताम वय 55 वर्ष रा. गडेली हा इसम गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, उजवा हाताला तसेच डाव्या पायाला गंभीर जखम्या झाल्या. दुसरा इसम नामे महादू सिताराम कोरेटी वय ५२ वर्ष रा. गडेली याच्या उजव्या हाताला जखम झाली. व तिसरा इसम रामसिंग पलटन सोनकुकरा वय 55 वर्ष रा. टेमली हा गुरे चारण्यासाठी गेला असता याला सुध्दा अस्वलने हल्ला करुन जखमी केल,सदर घटना ही शेत मालकाच्या शेताला लागुन असलेल्या जंगलामध्ये घडले. त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी किरकोळ जखमा आढळले त्याच्यावर सुध्दा ग्रामीण रुग्णालय कोरची येथे औषध्योउपचाराकरीता नेण्यात आले.

यापैकी नामे श्री. चम्मा पंडी नैताम वय 55 वर्ष रा.गडेली हा गंभीर जखमी असल्यामुळे सामान्य जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पुढील उपचाराकरीता नेण्यात आले.

या वेळी मौकावर एल.एम.ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी बेडगांव,राठोड क्षेत्र सहाय्यक बेडगांव, भिमटे वनरक्षक गडेली,मगरे वनरक्षक कालापाणी,जितेंद्र राउत यांनी सहकार्य केले.

आवाहन :-

सद्या जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू वास्ते व मशरुम उगवलेले आहेत लोक सकाळच्या सुमारास वास्ते व मशरुम तोडण्याकरीता जातात. जंगलात अस्वल तसेच इतर हिस्त्र जंगली प्राण्यांचा वावर आहे. याव्दारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, हिस्त्र प्राणी असलेल्या भागात वास्ते व मशरुम तोडण्याकरीता जावू नये. तसेच योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
 एल. एम.ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी बेळगाव

0/Post a Comment/Comments