शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप


शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

आष्टी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तसेच माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष नाना पसफूलवार कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली आज सकाळी ११ वाजता आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. गण्यारपवार हे कृषी सभापती असतांना सर्वसामान्य जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी जिल्हा चालवणाऱ्या आपल्या लाडका नेता अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आष्टी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केल्याचे नाना पसफूलवार यांनी सांगितले.या कार्यक्रमाला नाना पसफुलवार जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गडचिरोली, शंकर पाटील मारशेटिवार, शहर अध्यक्ष आनंदभाऊ कांबळे माजी सदस्य ग्रामपंचायत आष्टी, बंडु चापले, सुरज कुकुडकर अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त आष्टी,व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, आणी ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी देवा बोरकुटे यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments