नियमबाह्य व बेकायदेशीर ले-आऊट मंजूर करणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा -


नियमबाह्य व बेकायदेशीर ले-आऊट मंजूर करणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा -

अन्यथा आमरण उपोषण, वंचित बहुजन आघाडीचे अल्टिमेटम !

गडचिरोली,
        गडचिरोली नगर परिषद क्षेत्रात नियमबाह्य व बेकायदेशीर अनेक ले-आऊट मंजूर करण्यात येत असल्याने संबंधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी दैने यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
       पत्रकार परिषदेत बोलतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, शहरातील १८/१ या सर्वे नंबरला अकृषक करण्यासाठी सात बा-यावर ज्यां चार व्यक्तींचे नांव होते त्यातील दोघा जणानी दुस-या दोघा जणांच्या संमती पत्रावर खोट्या व बनावटी सह्या केल्याचे आढळल्याने गडचिरोली पो.स्टे. मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती.
      भूमापन क्रमांक १८/१ या शेत जमिनीच्या सात बारा उता-याचे निरीक्षण केल्यास सदर सात बा-याची एकूण आराजी ०.५५.३१हे.आर. ईतकी आहे, परंतु सदर शेत जमिनीचा पोटहिस्सा न पाडता केवळ ०.५१.५९ हे. आर. शेत जमिनीच्या मोजणी शिट डिमार्केट प्लॅन अंतिम आराखडा मंजूर केला आहे, सदर नकाशावर ०.५१.५९ हे. आर. शेत जमिनीच्या आराखड्यास मंजूरी देत असल्याचा उल्लेख आहे, परंतु उर्वरीत ०.३.७२ हे. आर. जागेचा कोठेही उल्लेख नाही, म्हणजेच ०.३.७२ हे. आर. शेत जमिन गहाळ झालेली आहे. आणि ही शेत जमिन नगर परिषद व नगर रचना विभागाने संगनमताने गहाळ केलेली आहे.
       विशेष असे की ०.३.७२ हे. आर. ज्यांच्या मालकिची आहे त्यांनी प्रस्तुत नकाशा मोजणीस लेखी अर्ज देऊन आक्षेप घेतला होता तरी परंतु या अर्जाची दखल घेण्यात आली नाही व संबंधित नगर परिषद व नगर रचना विभागाच्या अधिका-यांनी नियमांचा उल्लंघन करून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे ले-आऊट मंजूर करून शासनाची फसवणूक केलेली आहे.
        सदर भूमापन क्रमांकाचा ले-आऊट मंजूर करून आदेश पारित केले, त्याच प्रस्तुत आदेशात ज्या अटी व शर्ती आहेत त्याच अटी व शर्तीच्या आधारावर रेखांकनास दिलेली परवानगी रद्द होते. म्हणून सदर ले-आऊट रद्द करण्यात यावे व नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या ले-आऊट मंजूर करणा-या नगर परिषद व नगर रचना विभागाच्या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून आठ दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आमरण उपोषण करण्याचा ईशारा जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
       पत्रकार परिषदेला वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला आघाडीच्या नेत्या मालाताई भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, जिल्हा सदस्य भोजराज रामटेके युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, स्वप्निल बांबोळे आदि उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments