*पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत आश्रम शाळेतील मुलीच्या सुरक्षा संबंधी सूचना व प्रेरणादायी मार्गदर्शन*.


*पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत आश्रम शाळेतील मुलीच्या सुरक्षा संबंधी सूचना व प्रेरणादायी मार्गदर्शन*.
*कोरची:- जितेंद्र सहारे*
 
                  गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार शक्तीचा कायदा आणत असताना दुसरीकडे महिला आणि मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अनुषंगाने पोलीस स्टेशन कोरची येथील महिला पोलीस कर्मचारी यांचे ‘अल्पवयीन मुलींच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगाने घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचना’, या विषयावर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील मुलींच्या सुरक्षा व कायदेविषयक महिती यासंबंधी आढावा घेण्यात आला
   यावेळी आश्रम शाळेतील वर्ग पाचवी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन करण्यात आले. अनेकदा ओळखीचे लोक असल्याने त्यांचा स्पर्श बॅड असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला सेफ आणि अनसेफ टच काय आहे. गुड टच आणि बॅड टच यासंबंधी सविस्तर माहिती तसेच वयात येताना होणाऱ्या शारिरीक बदलानुसार घ्यावयाची खबरदारी, मुलींच्या छेडछाड व अत्याचार संदर्भात कायदेशीर तरतुदी संबंधी सूचना देण्यात आल्या.
   सदर मार्गदर्शनाकरीता पोलीस स्टेशन कोरची येथील महिला कर्मचारी अनिता मडावी, कविता नामेवार,वनिता कोरामी,वनश्री नुरूटी,वैशाली केरामी आदींनी मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक उमाकांत ढोक. हरेश कामडी,डाकराम ठाकरे,गीता राऊत, सुषमा अंबोणे,लीना वाटगुरे, भारती साखरे,नैना यंगलवार याप्रसंगी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments