*भारतीय मजदूर संघ जिल्हा चंद्रपूर १८ वे अधिवेशन संपन्न,*


*भारतीय मजदूर संघ जिल्हा चंद्रपूर १८ वे अधिवेशन संपन्न,*


पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

चंद्रपुर येथील आडोटेरियम हॉल शनिवार,१०ऑगस्ट रोजी सकाळ ११ वा.रोजी भारतीय मजदूर संघ चंद्रपूरचे १८ वे अधिवेशन थाटात संपन्न झाले.याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच दिप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.

 जिल्हाध्यक्ष म्हणून श्री.बंडूजी हिरवे, जिल्हामंत्री श्री.पवन ढवळे यांची एक मता निवड.



 आडोटेरियम हॉल, शक्ती नगर दुर्गापुर,चंद्रपूर येथे भारतीय मजदूर संघाचे 18 वे अधिवेशन श्री.प्रमोद येचलवार उपाध्यक्ष,भारतीय मजदूर संघ,विदर्भ प्रदेश, यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती भारतीय मंजदूर संघाचे विदर्भ प्रदेशचे महामंत्री श्री.गजानन गटलेवार,चंद्रपूर जिल्ह्याचे संघचालक श्री.तुषारजी देवपुजारी, अखिल भारतीय कोयला खदान महासंघाचे केंद्रीय महामंत्री श्री. सुधीरजी घुरडे,विदर्भ प्रदेशचे संघटन मंत्री श्री.विवेकजी आलेवार,विदर्भ उपाध्यक्ष महिला प्रतिनिधी सौ.सरला परशुराम उगे,अखिल भारतीय इंजिनिअर अँन्ड मेटल महासंघ मंत्री श्री.विठ्ठल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील विविध उद्योगातील पदाधिकारी व भारतीय मतदार संघाचे सदस्य यांच्या उपस्थित अधिवेशन संपन्न झाले.

सदर सदर अधिवेशनामध्ये भारतीय मजदूर संघाचे ध्येय धोरण,केंद्र व राज्य शासनाचे कामगार धोरण, कामगारांच्या समस्या व यावरील उपाययोजनांचे मार्गदर्शन,बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन कंपनी व्यवस्थापन यांनी बंद केली यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले. यावर कंपनी तात्काळ सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे,बरेच प्रकारचे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली,

तसेच सदर अधिवेशनात भारतीय मंजदूर संघ,चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी नवनियुक्त गठित करण्यात आली,जिल्हाध्यक्ष बंडूजी हिरवे, कार्याध्यक्ष प्रवीण मुनगंटीवार, उपाध्यक्ष- कविता नवघरे,जगजीवन दुधे, संदीप घोटेकर,जिल्हा मंत्री पवन ढवळे,सहमंत्री -प्रदिप पारखी,जितेंद्र काळे, गणेश उपरे, संघटन मंत्री-दिनेश गोदे, सह संघटन मंत्री-जयप्रकाश पांडे,कोषाध्यक्ष दानप्पा फाये, प्रचारक प्रमुख सागर गादेवार, कार्यालय प्रमुख योगेश कावळे, विजय माथनकर व इतर सदस्य यांची एकमताने पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.

0/Post a Comment/Comments