*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचिनारा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा*


*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचिनारा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

              कोचिनारा येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचिनारा
येथील प्रांगणात भारताचा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोरजी कराडे (अध्यक्ष )शाळा व्यस्थापन समिती कोचिनारा, सौ. रत्नमाला सहारे उपाध्यक्ष शा. व्या. स., सौ. सुनिताताई मडावी सरपंच ग्रामपंचायत कोचिनारा, रुपराम देवांगन उपसरपंच ग्रामपंचायत कोचिनारा, शाळेचे मुख्याध्यापिका मंदा आवारी मॅडम, दामोदर पटले सचिव ग्रामपंचायत कोचिनारा, विशेष प्रमुख अतिथी म्हणून आनंदभाऊ चौबे शिक्षण तज्ज्ञ कोचिनारा, शाळेचे संपूर्ण विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच संपूर्ण ग्रामवासी कोचिनारा पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला कर दाताच्या ईश्वर चिट्टीने नंबर लावून सौ. रुख्मिणीबाई खोबा ह्यांचा शुभ हस्ते ग्रामपंचायत कोचिनारा येथील ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आले व त्या कर दात्याला शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.त्यानंतर कोचिनारा येथील मुख्य चौकातील श्रावणजी घावडे पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन पार पाडण्यात आले.त्यानंतर शाळेतील ध्वजारोहण कु. मंदा आवारी मॅडम मुख्याध्यापिका यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आले. आकाशात फडकणाऱ्या झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडा गीत मुलांनी सादर केली.सोबतच हर घर तिरंगा अभियान अंतर्गत झेंडा प्रतिज्ञा व तंबाखूजन्य पदार्थ्यांचे सेवन न करणे बाबत शपथ घेण्यात आले. त्यानंतर लोकचंद जमदाळ संचालन करत सर्व पाहुण्यांना स्टेज मध्ये स्थान ग्रहण करुन शिक्षक व विद्यार्थ्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी, विद्यार्थ्यांना व जमलेल्या गावकर्यांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत कोचिनारा यांनी इयत्ता 10 वी व 12 वी वर्गातील हुशार गुणवंता विदयार्थ्यांचे *गुणवंत विद्यार्थी सन्मान* प्रमाणपत्र,शिल्ड, शाल व रोख रक्कम देवून पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांना उत्साह वाढविण्यासाठी मा.आनंदभाऊ चौबे यांनी प्रत्येक टीमला प्रोत्साहन पर बक्षिस दिले. शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थी व पाहुण्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन श्री लोकचंद जमदाळ सर तर आभार प्रदर्शन प्रकाश चिलबुले यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हिरासिंग बोगा , चंदरसाय मडावी , अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले, देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0/Post a Comment/Comments