*अखेर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून मार्ग केला सुकर*


*अखेर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून मार्ग केला सुकर*

*मनोज अग्रवाल यांनी खा. डॉ. नामदेव किरसान यांच्याशी केली चर्चा*

*कोरची - प्रतिनिधी*
          कुरखेडा कोरची हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते. कोरची येथील ढाब्या नजीक खूप मोठ मोठे खड्डे निर्माण झाले होते व त्यामध्ये जड वाहने फसत असल्यामुळे याचा फटका वाहन चालकांना तसेच सामान्य नागरिकांना सुद्धा बसत असल्याचे दिसून येत होते. निर्माण झालेल्या या खड्ड्यांमध्ये संबंधित विभागाकडून माती टाकण्यात आली होती ज्यामुळे अजून वाहने फसत असल्याचे निदर्शनास आले.
             याबाबत काँग्रेस पक्ष कोरचीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून याबाबत माहिती दिली व खा. डॉ. किरसान यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क करून रस्त्यातील खड्डे व्यवस्थितपणे बुजवण्याचे सांगितले आणि त्याच दिवशी सदर खड्डे व्यवस्थितपणे बुजवण्यात आले असून आता सदर मार्गावर मार्गक्रमण करणे हे सुकर झाल्यामुळे नागरिकांचे त्रास कमी झाल्याचे दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments