*कोरची आश्रम शाळेत महावाचन व निबंध लेखन उपक्रम*


*कोरची आश्रम शाळेत महावाचन व निबंध लेखन उपक्रम*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

             वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी व विचारांची क्षितिजे विस्तारीत होतात. अशी वाचनाची संस्कृती निर्माण व्हावी यासाठी शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील बहुउद्देशिय सभागृहात महाराष्ट्र शासनाचा महावाचन व निबंध लेखन उपक्रम घेण्यात आला. महावाचनाकरीता वाचनालयातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार कथा, कांदब ऱ्या, आत्मचरित्रे आणि विविध प्रकारचे मराठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
     आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचनकला लुप्त होताना दिसत आहे. म्हणून विविध शैक्षणिक पुस्तकाचे वाचन केल्यास भाषिक कौशल्य प्राप्त होते., ताणतणाव कमी होतो तसेच वाचनामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो. म्हणूनच समाज व राष्ट्राच्या हितावह वाचन संस्कृती रूजविणे आवश्यक आहे.
    या उपक्रमात शाळेतील इयत्ता ३ री ते इयत्ता १२ वी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेतील प्रा.हरेश कामडी, प्रा.परेश मेश्राम,प्रा.रमेश रामटेके, प्रा.मनोज गजभिये,प्रा. अभिमन्यू वाटगुरे प्रा.अरुण कायंदे,प्रा.यामिनी देशमुख प्रा.दिपक कचलाम ,भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे,कुणाल गोवर्धन, देवेंद्र मडावी,संतोष सहारे,गीता राऊत,डाकराम ठाकरे, मनोज आचार्य, सुषमा अंबोणे, लीना वाटगुरे, भारती साखरे,प्रशिल जांभूळकर यांच्या उपस्थित उपक्रम यशस्वी राबविण्यात आला.

0/Post a Comment/Comments