*कोरची येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून केली मूक निदर्शने*


*कोरची येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून केली मूक निदर्शने*

*बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस -शिवसेना ठाकरे गट आणि रा. कॉ..शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली मूकनिदर्शने*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

             बदलापूर येथे करण्यात आलेल्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्त दोषींना फाशी देण्यात यावी व महायुती सरकारच्या कार्यकाळात महिला हे सुरक्षित नसल्याचे प्रतिपादन करीत आज कोरची शहरात महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून मूक निदर्शने करण्यात आली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ व आरमोरी येथील एका मुलीवर काही इसमांनी अमानवीय कृत्य केले या विरोधात काँग्रेस -शिवसेना ठाकरे गट आणि रा. कॉ.शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मूकनिदर्शनात सहभाग घेतला. 

कोरची येथील मुख्य चौकात निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळेच अशा घटना मध्ये वाढ होत असून मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली.

यावेळी राज्यपाल यांना तहसीलदार यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले. सदर आंदोलनात प्रतापसिंग गजभिये तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी कोरची, डॉ. नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष (ठाकरे गट), सौ. हर्षलता भैसारे नगराध्यक्षा कोरची, प्रेमिलाताई काटेंगे, सदरुद्दीन भामानी, हिरा उईके, रामसुराम काटेंगे, रामनाथ कोरचा, वसीम शेख, दीपक हलामी, कौशल्या केवास, रामदास साखरे, चतुर सिंद्राम, आसाराम सांडील, लहानू सहारे, रोशन शेंडे, अरुण मोहुर्ले, धर्मा नैताम, रवी नंदेश्वर, महेश करशी, कांताराम जमकातन, गणेश मडावी, सुनील कुमरे, राजेश नैताम, किशोर नरोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कुठलीही अनुचित घटना घटता कामा नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments