*कोरची येथे एका इसमाचा कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला*

जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची 
*कोरची येथे एका इसमाचा कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला*

*जखमी वृद्धाची जीवन मृत्यूशी झुंज*


*कोरची* : येथील बस स्थानकाच्या मागे वॉर्ड क्रमांक 9 येथील रहिवासी निल्पा नरसु मडावी वय अंदाजे 46 हा दारूच्या नशेत एका युवकाला मारहाण करीत असताना दानुराम बैसाखू हिडामी वय अंदाजे 60 यांनी मध्यस्ती करून या युवकाला मारू नको असे निल्पा याला सांगून घरी येऊन आपल्या खाटेवर झोपी गेले एवढ्याच शुल्लक कारणाचा राग मनात धरून निलाराम हा कुऱ्हाड घेऊन संध्याकाळी सुमारे 7 च्या दरम्यान दानुराम यांच्या घरी जाऊन झोपी असलेल्या दानुराम यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. वार इतका जोरदार होता की दानुराम च्या डाव्या हाताचा मनगटाची अक्षरशः नस कापली गेली व गालावर सुद्धा मार लागल्यामुळे घरातील संपूर्ण परिसरात रक्तच रक्त दिसून आले. मार लागल्यानंतर परीसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले व प्राथमिक उपचार करून लगेच त्यांना गडचिरोली येथे रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रेफर करण्यात आले.
         दानुराम हिडामी यांनी दिलेल्या माहितीवरून आज झालेल्या संवादाशिवाय जुने कुठलेही वाद विवाद निल्पा याच्याशी नव्हते. नेमका याच कारणामुळे हा जीवघेणा हल्ला करण्यात आला की यामागे दुसरे काही कारण आहे याचा शोध कोरची पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

0/Post a Comment/Comments