*लाॅयड्स मेटल उद्योग व लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन मार्फत विविध उपक्रम*


*लाॅयड्स मेटल उद्योग व लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन मार्फत विविध उपक्रम*


पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात,शेतीविषक उपक्रम शैक्षणिक,महिला बचत गट उपक्रम असा अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच माध्यमातून दि.७ आगस्ट २०२४ बुधवार रोजी सामाजिक दायित्व विभागांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेणगाव येथे चष्मे वितरण कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व शाळेत भौतिक सुविधा पुरविने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू नागरिकांना मोफत चष्मे मिळावे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नये व त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करता यावे, यासाठी शाळेत पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर व वॉटर कुलर,वाचनालय कपाट, कार्यालयीन कपाट,टेबल,खुर्च्या,पुस्तके,नवोदय व स्पर्धा परीक्षा पुस्तके,घड्याळ, खेळाचे साहित्य, प्रत्येक विद्यार्थ्यांना स्कुल बॅग,विषयानुसार नोटबुक, वॉटर बॉटल,कुंडी,व ज्यांनी नेत्र तपासणी केली अशा नागरिकांना चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे साहित्य नागरिकांना,विद्यार्थ्यांना व शाळेला देण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लॉयड्स मेटल्स उद्योगाचे युनिट हेड श्री. वाय.जी.एस.प्रसाद यांनी केले तर अध्यक्ष म्हणुन सौ.पुष्पाताई मालेकर,प्रमुख पाहुणे म्हणुन लॉयड्स मेटल्सचे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष श्री.पवन मेश्राम, गट शिक्षण अधिकारी श्री.निवास कांबळे,केंद्र प्रमुख श्री.धनपाल फटिंग,श्री.झाडें,श्री.तरुण केशवाणी, कु.नाम्रपाली गोंडाने,मुख्याध्यापिका कातकर मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.विजय बावणे, अनुराग मत्ते,अरविंद चौधरी उपस्थित होते.
 विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे त्यांच्या पुढील भविष्यासाठी व गावातील नागरिकांना लॉयड्स मेटल्स ला जे सहकार्य करता येईल ते सहकार्य कंपनी करेल असे मनोगत श्री.वाय.जी.एस.प्रसाद यांनी व्यक्त केले
 तर गट शिक्षण अधिकारी श्री. निवास कांबळे यांनी लॉयड्स मेटल्स कंपनी चे आभार मानले. व शाळेला व विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या त्याचा खूप फायदा आम्हाला होणार आहे व विद्यार्थ्यांची गुणवता वाडीस मदत होणार आहे लॉयड्स मेटल्स शैक्षणिक क्षेत्रात व गावातील विकासात उत्कृष्ट पद्धतीने कार्य करीत आहेत असेच कार्य कंपनीने भविष्यात पण करावे अशी विनंती सुद्धा त्यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.मनीषा बरडे,सौ. मंजुषा वडस्कर,सौ.प्रिया पिंपळकर यांनी प्रयत्न केले.

0/Post a Comment/Comments