*जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांची संयुक्त बैठक जिल्हाधिका-यांनी घ्यावी*


*जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांची संयुक्त बैठक जिल्हाधिका-यांनी घ्यावी*

वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिका-यांकडे मागणी

गडचिरोली, 
         जनतेच्या विविध समस्या प्रलंबीत असल्याने नागरिकांना संबंधित विभागाचे वर्षोगिनती उंबरठे झिजवावे लागते परंतु जनतेच्या समस्यां मार्गी लागत नसल्याने दस्तुरखुद्द जिल्हाधिका-यांनीच संबंधित विभागाच्या अधिका-यांची व समस्चाग्रस्त असणा-या नागरिकांच्या प्रतिनीधींची संयुक्त बैठक बोलावून जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात याव्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी दैनेे यांना निवेदन देऊन केली आहे.
          वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी संजय दैने यांची नुकतीच भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
       या निवेदनात म्हटले आहे की, लोह खनिज उत्पादन करणा-यां कंपन्यांमध्ये बाहेरील राज्यातील व बाहेरील जिल्ह्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल कामगार म्हणून घेतले आहे त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील लोक नगन्य आहेत हा या जिल्ह्यातील बेरोजगारांवर अन्याय आहे त्यामूळे गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांना शंभर टक्के कुशल - अकुशल कामगार म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, गडचिरोली ग्रामपंचायत असतांना शासनाने गोकुलनगर व ईंदिरानगर या वार्डात बेघर धारकांना घरे बांधून दिले होते परंतु आजतागायत बहुतांश नागरिकांना घराच्या जागेचे पट्टे मिळालेले नाहीत त्यामूळे या बेघर धारकांना तात्काळ घराच्या जागेचे पट्टे देण्यात यावे, जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वन हक्काचे पट्टे मिळाले परंतु जितक्या हेक्टर आरचे वनहक्क पट्टे मिळाले त्याचे सात बारे मात्र प्रत्यक्षात कमी जागेचे देण्यात आले आहेत त्यामूळे वनहक्काचे जितक्या जमिनीचे पट्टे मिळाले तितक्याच जमिनीचे सातबारे सुद्धा मिळाले पाहिजे अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
          या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या मार्गी लावाव्यात व नागरिकांची होणारी पायपीठ थांबवावी असेही या निवेदनात म्हटले आहे.
        निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, वडसा तालुक्याचे महासचिव प्रविण रामटेके, रतिराम मेश्राम, पुरुषोत्तम वाघाडे, पंढरी कोलहटकर, विलास लांडगे आदिंचा या शिष्ठमंडळात समावेश होता.


0/Post a Comment/Comments