संजय पंदीलवार परिवाराची महालक्ष्मी स्थापनेची परंपरा कायम; दरवर्षी प्रमाणे यंदाही होणार भक्तांची दर्शनासाठी गर्दी


संजय पंदीलवार परिवाराची महालक्ष्मी स्थापनेची परंपरा कायम; दरवर्षी प्रमाणे यंदाही होणार भक्तांची दर्शनासाठी गर्दी



आष्टी येथील प्रतिष्ठित शेतकरी, व सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार व माजी जिल्हा परिषद सदस्य रूपाली पंदिलवार यांच्या परिवारात १८ वर्षांपासून अखंडपणे दरवर्षी भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी स्थापनेची परंपरा कायम राखली जात आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा पंदीलवार परिवारात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे.
पंदीलवार परिवारात २००८ पासून भाद्रपद महिन्यात महालक्ष्मीची स्थापना करून पूजाअर्चना केली जात आहे. ही अखंड परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालविला जात आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आष्टी परिसरातील इल्लूर, अनखोडा, कढोली, चपराळा, चौडमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, चंदनखेडी, मार्कंडा (कं) आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने येऊन मनोकामनेसाठी प्रार्थना करतात. या उत्सवात सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी होत असल्याने सर्व धर्म समभावाचे वातावरण येथे निर्माण होत असते.
पंदिलवार परिवारांकडून सातत्याने सामाजिक कार्यात योगदान राहत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्सवात परिसरातील नागरिक सहभागी होत असतात. परिवाराकडून अपघातग्रस्तांना मदत वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, नैसर्गीक आपत्ती ग्रस्तांना मदत केली जाते हा वारसा त्यांनी मागील अनेक वर्षांपासून चालविला आहे. यामुळे त्यांच्या घरील महालक्ष्मी उत्सवाला विशेष महत्व प्राप्त होत असते. संजय पंदिलवार यांच्या वडीलांकडे मार्कंडा कंन्सोबा येथील पोलिस पाटील पद होते मार्कंडा कंन्सोबा येथील पोलिस पाटील घराणा म्हणून पंदिलवार घराण्याची आजही ओळख आहे.

0/Post a Comment/Comments