*मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी मय्यत परिवाराची भेट घेतले


*मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी मय्यत परिवाराची भेट घेतले!*
यापुढे अंधश्रध्देला बळी न पडण्याचे आवाहन केले
*आर्थिक मदतही केले*
*अहेरी:*- अहेरी तालुक्यातील येरागड्डा येथील बाजीराव रमेश वेलादी (६वर्षे )दिनेश रमेश वेलादी साडेतीन वर्षे असे दोन्ही भावंडे एकापाठोपाठ 4 सप्टेंबर रोजी मरण पावल्याने वेलादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवार 5 सप्टेंबर रोजी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात मयत परिवाराची भेट घेऊन सांत्वना केले व वीस हजाराची आर्थिक मदत करून या पुढेही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे बोलले.
   मृतक बालकाचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव हे आजोबाचे गाव असून निधनाच्या दोन दिवसाआधी आई - वडीलांसमवेत पत्तीगाव आले होते. बुधवारी बाजीरावला ताप आला. पाठोपाठ लहान भाऊ दिनेश ही आजारी पडला आई-वडिलांनी दवाखान्यात नेण्याऐवजी परिसरातील एका पुजाऱ्या कडे नेले. काही वेळातच म्हणजे सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान बाजीरावाचा मृत्यू झाला तर दुपारी बारा वाजता दिनेशही प्राण सोडले. शवविच्छेदना करिता अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पार्थिव दाखल करण्यात आले असता मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठून पीडित परिवाराची भेट घेऊन सांत्वना करून वीस हजाराची आर्थिक मदत केले. 
   या प्रसंगी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी, दुर्घटनेवर नाराजी व दुखवटा व्यक्त करून तबीयत खराब झाल्यास अंधश्रध्देला बळी न पडता आणि पुजारी व जडीबुट्टी न घेता नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा दवाखान्यात औषधोपचार करून घ्यावे असे आवाहनही केले.
    यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबलु हकीम, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, श्रीकांत मद्दीवार, संतोष तोरे ,कैलास कोरेत, सांबय्या करपेत, संदीप ढोलगे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments