*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदाराम येथे आदिवासी समाजाची बैठक संपन्न*


*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदाराम येथे आदिवासी समाजाची बैठक संपन्न*

*इंदाराम येथील आदिवासी समाजातर्फे बैठकीचे आयोजन*

*अहेरी:* *तालुक्यातील इंदाराम ग्रामपंचायत हद्दीतील गावातील समस्या बद्दल आदिवासी समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी बैठकीचे आयोजन करून सदर बैठकीला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना आमंत्रण देऊन बोलविण्यात आले.*
      *या बैठकीत इंदाराम ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तींनी परिसरातील आदिवासी समाज व इतर समाजाच्या समस्या सह विविध विषयांवर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या समोर विषय मांडून सखोल चर्चा करण्यात आले.या वेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करून आपल्या आदिवासी समाजाच्या तसेच इतर समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत मी सोबत आहे व पुढेही राहणार असे आश्वासन दिले.*
         *सदर बैठकीस परिसरातील आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी,आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती सह आविस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments