*कोरची तालुक्यातील शाळेला मिळाले संगणक व प्रिंटर संच*
*-नागपुर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या निधीतून मिळाले.*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची तालुका हा नक्षलग्रस्त तथा अति दुर्गम भाग म्हणून ओळखला जात असून, सदर तालुक्यात आज पर्यंत बऱ्याच शिक्षक आमदारांचे दुर्लक्ष होत होते. परंतु विद्यमान असलेले नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले यांनी आपल्या निधीतून तालुक्यातील खाजगी अंशदानित व अनुदानित आठ शाळांना संगणक व प्रिंटर संच दिले.
यामुळे शिक्षकांचे शालेय कामकाज होण्याकरिता सुलभ झाले.आजपर्यंत शासकीय शाळांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात परंतु खाजगी शाळांना पाहिजे तेवढा लाभ मिळत नाही. परंतु शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले यांनी आपल्या निधीतून पुन्हा तालुक्यातील शाळेसाठी लागणारी उपयोगी वस्तू देण्याचे आश्वासन दिले. यासाठी तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच कोरची तालुक्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे,कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर ,उपाध्यक्ष मनोज निंबारते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरज हेमके, यादवराव धानोरकर ,विकास जनबंधू, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य रवी सहारे, तालुका अध्यक्ष नामदेव नागपुरे, तालुका कार्यवाह अजय पुल्लूरवार, पांडुरंग नागपुरे, होमराज बिसेन ,हीवराज सोमनकर आदी उपस्थित होते.
Post a Comment