मार्कंडा कंन्सोबा येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा ; पोलीसांचा चोख बंदोबस्त


मार्कंडा कंन्सोबा येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा ; पोलीसांचा चोख बंदोबस्त

भास्कर फरकडे गडचिरोली वार्ता न्युज संपादक


आष्टी : गडचिरोली वार्ता न्युज प्रतिनिधी । चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे पारंपारिक पध्दतीने बैलपोळा सण सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या मार्कंडा कंन्सोबा येथे सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी पारंपारिक पध्दतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी‌ सकाळपासून आपल्या बैलांची सजावट करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गावातील  तळ्याच्या पाळीवर असलेल्या हनुमान मंदिर येथे जावून बैलांकडून फेऱ्या मरण्यात आले. त्यानंतर तेथुन वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील मुख्य चौकात शेतकरी बांधवांनी आपला बैलांना एकत्र करून. गावातील मुख्य चौकात उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. त्यानंतर शेतकरी बांधवांनी आपल्या घरी बैलजोडीला नेवून त्यांना नैवैद्य देण्यात आले. यावेळी मार्कंडा कंन्सोबा येथे पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विजय बहिरेवार, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल पंदिलवार, माजी सरपंच निलकंठ आलाम , बंडू आलाम, नानाजी बिटपल्लीवार, अमोल कुबडे, प्रभाकर लोणारे, आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments