*राष्ट्रवादी काँग्रेस (श,प) पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष पदी सागर मूलकला यांची निवड...!*

*राष्ट्रवादी काँग्रेस (श,प) पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष पदी सागर मूलकला यांची निवड...!*  



सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील गेल्या ०८ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सागर मूलकला यांना नुकतेच राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, मूलकला फाउंडेशनच्या माध्यमातून सागर मूलकला यांनी तालुक्यातील अनेक गोर गरीब कुटुंबीयांना अर्थीक व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली, तसेच अपघातातील अनेक जखमींना मदत करून त्याचे जीव देखील वाचविली आहे, राष्ट्रवादी कांग्रेसच्या फुटीनंतर त्यानी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जिल्हाध्यक्ष - अतुल भाऊ गण्यारपवार यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करून गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली, आणि तालुक्यातील विविध रस्ते, विद्युत समस्या, पाण्याची समस्या, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी, शालेय विद्यार्थ्यांची समस्या, बि,एस, एन,एल,ची नेटवर्क बाबत असे अनेक समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक आंदोलने करून समस्या सोडविण्याची प्रयत्न आणि पक्ष संघटन वाढीवसाठी त्यानी काम केली आहे,
               त्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांनी दखल घेऊन नुकतेच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बैठकीत 
सागर भाऊ मूलकला यांना सिरोंचा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे,
         निवळी बाबत तालुका स्थरावर सागर भाऊ मूलकला यांची अभिनंदनाची वर्षाव देखील केला जात आहे,

0/Post a Comment/Comments