राजे धर्मराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा

राजे धर्मराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा
आष्टी ( प्रतिनिधी ) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आली.
शिक्षक दिनानिमित्त छात्रसंघाचे वतीने प्राचार्य , प्राध्यापक , शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वयंशासन कार्यक्रम घेण्यात आला. त्यात ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक संध्या मादासवार , द्वितीय मोहिनी सोनटक्के , तृतीय क्रमांक अर्पणा बहिरेवार हिने मिळविला.माध्यमिक गटात प्रथम क्रमांक जानवी खंडारे , द्वितीय क्रमांक स्वरा ढूमने , तृतीय क्रमांक अर्जुन जाधव याने पटकाविला . मिडलस्कुल विभागामध्ये प्रथम क्रमांक हर्ष गिरसावळे ,द्वितीय क्रमांक जानवी ढूमने , तृतीय क्रमांक युगांती गणवीर हिने पटकाविला.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य व उपस्थित मान्यवरांनी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य म्हणून अभिजित अवथरे व मुख्याध्यापक म्हणून गुंजन बामनकर यांनी उत्कृष्ट कार्य केले.
याप्रसंगी विद्यार्थी हर्ष गिरसावळे , प्रणय वागदरकर , शाल्मली गोंगले , अंशुली अवथरे इत्यादीनी भाषणे दिली.
याप्रसंगी शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र ठाकरे , सुधीर फरकाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे संचालन जानवी खांडरे व प्रा.नारायण सालूरकर यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments