*गणेशोत्सवा निमित्ताने कुणघाडा रै. इथे रक्तदान शिबीर संपन्न*


*गणेशोत्सवा निमित्ताने कुणघाडा रै. इथे रक्तदान शिबीर संपन्न*
#शिबिरात 37 दात्यानी केले रक्तदान.
लखमापूर बोरी :-
       जय हनुमान भाद्रपद गणेश मंडळ कुणघाडा रै. तर्फे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवील्या जात असते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते हेच पाहून स्वयं: रक्तदाता जिल्हा समिती, गडचिरोली च्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळातर्फे किसान भवन कुणघाडा रै इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी रक्त पेढी गडचिरोली येथील चमु ने रक्तदात्यांचे रक्तगट तपासून रक्त संकलन केले. 
            रक्तदान शिबिरामध्ये प्रशांत पिपरे,विनोद कोसमशीले, निकेश घोंगडे, तुषार कोहळे, भूषण कोठारे, दीपक कुणघाडकर, नितीन मोंगरकर, मनिष भुरसे, विघ्नेश्वर टिकले, ओम कोमलवार, रक्षक सातारे, मनोहर कुणघाडकर, शुभम काबरा, नितेश किरमे, अनिकेत चव्हाण, गौरव भांडेकर, निखिल दूधबळे, सुनील भुते, गणेश पीपरे, राकेश सातारे, मिनल दूधबळे, सचिन शिऊरकर, आकाश बुरांडे, सत्यवान दूधबळे, परिमल भांडेकर, वाल्मिक घोंगडे, प्रेमचंद वासेकर, जगन्नाथ कोसमशिले, दुशांत पालीकोंडावार, अभय भांडेकर, नागेश वासेकर, रोहित काटवे, सौरव भांडेकर, श्रेयस भांडेकर, दिलखुश उर्फ खरवींद्र कुणघाडकर, निलेश पीपरे, अतुल भांडेकर इत्यादींनी रक्तदान केले.
सर्व रक्तदात्याना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना फळ व खाऊ दिले. 
     रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. स्वयं: रक्तदाता जिल्हा समितीचे निशिकांत नैताम, पितांबर टिकले, दिलखुश बोदलकर यांचे विशेष मार्गदर्शनपर सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments