जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी, तालुका एटापल्ली येथील उपक्रमशील शिक्षक श्री, मांतय्या बेडके यांचा सत्कार


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी, तालुका एटापल्ली येथील उपक्रमशील शिक्षक श्री, मांतय्या बेडके सर यांचा ५ सप्टेंबर २०२४ ला शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारताचे राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले. तालुक्यातील अतीशय दुर्गम भागातील शिक्षकाचा राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केल्याने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने त्यांच्या नागेपल्ली स्थित स्वगृही जाउन शाल,श्रीफळ व पिंपळाच्या झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.अविनाश तालापल्लीवार सर,जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष मा.राजू शेंडे सर,तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री दिपक नागपुरवार सर,कार्यवाह श्री निलकंठ ओंडरे सर,श्रीनिवास पुल्लुरवार सर,सुधाकर वेलादी सर,पोई सर,निल्लावार सर,तसेच अहेरी तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री, राजू आत्राम सर,कार्यवाह श्री रमेश चांदेकर सर होते. या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून श्री बेडके सरांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

0/Post a Comment/Comments