आष्टी पोलिसांची धडक कारवाई; ६० जनावरांसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त


आष्टी पोलिसांची धडक कारवाई; ६० जनावरांसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा - घोट मार्गाने आयशर , पिकअप अशा तीन वाहनांमध्ये जनावरे कोंडून वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून आष्टी पोलिसांंनी ६० जनावरांची सुटका केली. व जनावरांसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केले. यात सदर वाहने जप्त करुन अज्ञात वाहनचालकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या गुप्त सूचनेनुसार मार्कंडा कंनसोबा - घोट मार्गावर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांचे तीन वाहन आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल काळे यांच्या नेतृत्वात पि एस आय देवीदास मानकर, पोलिस शिपाई रवी मेंदाळे, प्रशांत चौधरी, प्रमोद दुर्गे यांनी अडविला. या वाहनांची झडती घेतली असता अतिशय निर्दयपणे जनावरे कोंबलेली आढळली. पोलिसांना पाहताच वाहन चालकांनी आपले वाहन सोडून पसार झाले. हि घटना मार्कंडा कंन्सोबा ते घोट मार्गावर आज दिनांक १६ स्प्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार एम. एच. ३४ बि. झेड. ५६५४ एम. एच. २९ बि. ई. ३९२५, एका वाहनाचे नंबर दिसून येत नव्हते त्यामुळे खात्री पटली नाही.
सदर जनावरे वाहनासह पशुवैद्यकीय दवाखाना आष्टी येथे जनावरांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी नेले असल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध आष्टी पोलीस घेत असल्याची माहिती ठाणेदार विशाल काळे यांनी दिली

0/Post a Comment/Comments