भगवंतराव महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा*


*भगवंतराव महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा* एटापल्ली, भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे 5 सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून आणि श्री चक्रधर स्वामी यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन बुटे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुधीर भगत डॉ. बी.डी कोंगरे प्रा. विनोद पत्तीवार डॉ. व्ही ए दरेकार प्रा. निलेश दुर्गे डॉ. एस पी पाटील प्रा. भारत सोनकांबळे डॉ. एस बी वडस्कर प्रा. अतुल बारसागडे व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ एस एन बुटे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून केली. या कार्यक्रमाचे संचालन पियुष गोंगले आणि आदित्य राऊत यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. बी.डी. कोंगरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments