आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी दिला जखमी महिलेला मदतीचा हात


आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी दिला जखमी महिलेला मदतीचा हात

चामोर्शीः- गेल्या दोन दिवसापासून वातावरणातील बदल, ढगाळ वातावरण असतानाच आज सकाळ पासून रिमझिम पाऊस असताना गोंडपिंपरी जवळील चेकपिंपरी येथील राकेशने आपल्या मोटासायकलने पत्नी, मुलगा व सासू यांना घेऊन कोणसरी वरून चामोर्शी कडे येत असताना जामगिरी फाट्याजवळ पावसामुळे मोटासायकलवरून सासू खाली पडल्याने गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडल्या होत्या दरम्यान आष्टीचे सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार हे आपल्या वाहनाने गडचिरोली कडे जात असताना त्या गंभीर जखमी महीला रक्तात पडलेल्या दिसल्या त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्या महिलेला मदतीचा हात पुढे करून आपल्या वाहनात येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गोंडपिंपरी जवळील चेकपिंपरी येथील राकेश कुबडे हे आपल्या मोटासायकलने पत्नी, मुलगा व सासू सौ. कुंदा कुळमेथे वय ५५ यांना कोंनसरी वरून चामोर्शीकडे येत असताना जामगिरी फाट्याजवळ पावसामुळे मोटासायकल वरून मागे बसलेल्या सासू खाली पडल्याने त्या गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या होत्या दरम्यान आष्टी चे सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार हे आष्टी वरून गडचिरोली कडे जात असताना त्यांना महीला जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या दिसल्या त्यांनी क्षनाचांही विलंब न करता स्वतःच्या चारचाकी वाहनांने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सदर सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार याचे तालुक्यात कौतुक केले आहे 



0/Post a Comment/Comments