सुरजागड येथिल विद्युत पुरवठा सुरळीत करा, गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता एटापल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 


सुरजागड येथिल विद्युत पुरवठा सुरळीत करा, गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता एटापल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी


एटापल्ली: सुरजागड ग्रामपंचायत पुरसलगोंदी तालुका एटापल्ली येथे 06 महिण्यापासुन विद्युत पुरवठा बंद आहे आठवड्यातून फक्त 2 ते 3 दिवस विद्युत पुरवठा असते आणि नंतर पूर्ण आठवडा विद्युत बंद असते, गावक-यांना नाहक त्रास सहण करावा लागत आहे. रात्री लोकांना अंधारत निवन जगावे लागत आहे. विद्युत पुरवठा खंडीत असल्यामुळे लोकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविद्या उपलब्ध होत नाही आहे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जवळपासच्या गावांची विद्युत पुरवठा सुरळीत आहे परंतु आमच्या गावची विद्युत पुरवठा खंडीत आहे. तरी मौजा- सुरजागड येथिल विद्युत पुरवठा गट्टा वरून न करता एटापल्ली वरून देण्यात यावे जेणे करून आम्हाला विद्युत पुरवठा सुरळीत मिळेल.

या आधी सुध्दा आपल्या कार्यालयात अर्ज केला होता परंतु अध्यात कोणतीही कार्यवही झाली नाही. तरी आपणास पुनश्च नम्र विनंती आहे की, तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याची विनंती
मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा
उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय एटापल्ली, मुख्य अभियंता एम.एस.सी.बी म.रा गडचिरोली
उपभियंता एम.एस.सी.बी. म. रा मर्या. आलापल्ली यांना गावकऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे 

0/Post a Comment/Comments