*अम्पूडू पूजेस माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती*


*अम्पूडू पूजेस माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती*

*आलापल्ली येथील आदिवासी समाजातर्फे अम्पूडू पूजेचे आयोजन*

*◆अहेरी◆:* *आदिवासी समाज हे निसर्ग पूजक असून,आदिवासी समाजाचे रूढी,प्रता,परंपरा व पूजा करण्याची पद्धत हे वेगळे आहे.*

      *गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून परिचित आहे त्यात आलापल्ली गावात आदिवासी समाजाची संख्या खूप जास्त असून या गावात समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून देवी देवतांचे पूजा दरवर्षी केल्या जातात,याचाच एक भाग म्हणून नुकतेच आलापल्ली येथील आदिवासी समाजातर्फे अम्पूडू पूजेचे आयोजन करून या पूजेला आदिवासी समाज बांधवाकडून आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते.या धार्मिक कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत देवी देवतांचे पूजा करून आपल्या क्षेत्रातल्या सर्व समाजा सुख शांती ने राहो,बडीराजाचे सुखी राहो असे प्रार्थना केले.*

        *या वेळी समाज बांधवातर्फे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला,या अम्पूडू पूजेस आलापल्ली येथील आदिवासी समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments