*त्या नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या तसेच संबंधित कात्रदारावर गुन्हा दाखल करा..!*


*त्या नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या तसेच संबंधित कात्रदारावर गुन्हा दाखल करा..!*

       *काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी....!*

अहेरी : तालुक्यातील खमणचेरू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकूलगुडम येथील लगु पाठबंधारे तलाव आहे.कंत्राटदारांनी विना परवानगीने पाणी सोडल्याने शेतकऱ्याचे उभे पिक नष्ट होऊन अतोनात नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे त्या लगू पाठबंधारेतील पाणी परिसरातील नागरिक शेतात वापरून धान पिकवत होते.धान व कापूससह अनेक पीक तोंडावर आल्याने आता त्या शेतातील पाणी वापरण्यासाठी बंधारातील पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

आज टेकूलगुडम,महागाव,खमनचेरू येथील समस्त शेतकरी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांची भेट घेऊन त्याची समस्या बाबत सांगितल्याने कंकडालवार लगेच त्या शेतकऱ्यांना घेऊन तलावाच्या लगू पाटबंधारे विभागाची तलाव पाहणी केले.तसेच त्या शेतातील सुद्धा पाहणी करून सद्या होणाऱ्या नुकसानाची मोका पंचनमे करून कंत्राटदाराकडून भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार.तसेच ठेकेदार केलेल्या कृत्यामुळे शेतकरी अतोनात नुकसान झाल्याने तात्काळ त्या ठेकेदारला गुन्हा दाखल करण्यात यावी अशी कंकडालवार यांनी मागणी केले.

यावेळी कंकडालवार सोबत खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सायलू मडावी,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,दिवाकर मडावी,सुधाकर तलांडे,मदनय्या वेलादी,लालू वेलादी,प्रवीण दुर्गे,मोरेश्वर तलांडे,एनकुलू वेलादी,पोचा तलांडे,शंकर वेडा,पुष्पा आत्राम,सुमन तलांडे,सुनीता तलांडेसह महागाव,टेकुलगुडा,खमनचेरू येथील समस्त शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments