भगवंतराव महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने मिळविले अजिंक्यपद


भगवंतराव महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने मिळविले अजिंक्यपद
एटापल्ली - स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील मुलांच्या व्हाॅलीबाल संघाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आंतरमहाविद्यालयीन व्हाॅलीबाल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या व्हालीबाल संघाचा चुरशीच्या सामन्यात पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले आहे. 
मुलांच्या व्हॉलीबाल संघाने शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संदिप मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली 
यश झाडे याच्या नेतृत्वात अक्षय गोटा, सतीश नरोटे, पंकज लेकामी, अनिश दुर्वा, साहील आत्राम, शिवाजी नवडी, सुरज आलाम, साहील हिचामी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हे उल्लेखनीय यश प्राप्त केले. 
या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन बुटे तसेच सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

0/Post a Comment/Comments