शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख महेश मोहुर्ले यांचे पक्षाला जय महाराष्ट्र!*


*शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख महेश मोहुर्ले यांचे पक्षाला जय महाराष्ट्र!*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 'घडी 'बांधले
*पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षाला बळकटी*

*अहेरी*:- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा सेनेचे अहेरी तालुकाप्रमुख महेश मोहुर्ले यांनी असंख्य युवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचे दुप्पटे गळ्यात टाकून स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे अहेरी तालुका प्रमुख महेश मोहूर्ले यांनी असंख्य युवकांसोबत प्रवेश केले.
       राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )पक्षात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे अहेरी तालुका प्रमुख महेश मोहुर्ले यांच्या सोबत युवा सेनेचे शाखा प्रमुख सतीश कावळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मोहुर्ले, प्रफुल्ल शेंडे, बंटी गुरूनुले, अक्षय गुरुनुले, विक्रम गुरूनुले, श्रिनल लेनगुरे, अविनाश गुरूनुले , श्रीकांत गुरुनुले, रितिक मोहूर्ले, आशिष गुरूनुले, रवी निकुरे, विरू कावळे , राजू मोहूर्ले आदींनी प्रवेश केले.
   उल्लेखनीय म्हणजे युवा सेनेचे महेश मोहूर्ले हे मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाचे असून नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात व गोर गरिबांच्या मदतीला धावून जात असतात, युवा वर्गात व माळी समाजात त्यांची चांगली पकड असून सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिवसेना युवा सेनेचे महेश मोहुर्ले यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाला  अखेरचे 'जय महाराष्ट्र' करून  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची "घडी" हाताला बांधल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट)अजून नवी ऊर्जा व बळकटी मिळाली आहे.
     पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, डेव्हिड बोगी , अयान पठाण आदी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments