साहेब ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवा. निवेदनातून मागणी : राहुल वैरागडे


साहेब ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवा.

निवेदनातून मागणी : राहुल वैरागडे


चामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा केंद्रातील 
मूल - चामोर्शी रस्ता सिमेंट काँक्रीट मंजूर करा. भेंडाळा येथील राजीव गांधी उपसा सिंचन योजनेचे बरेच वर्षापासून सर्वे होऊन सुद्धा मंजूर झाले नाही याचा पाठपुरावा करण्यात यावा. मूल - चामोर्शी 
एस.टी महामंडळाच्या बस फेऱ्या अर्ध्या तासांनी यावे विद्यार्थ्यांना व नागरिकांची गैरसोय होणार नाही.एस.टी डेपो महामंडळ बस स्टँड लवकर तयार करण्यात यावा. प्राथमिक आरोग्याला एम.बी.बी.एस डॉ.नियुक्ती करण्यात यावी.
व भेंडाळा येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे.या ठिकाणी नॅशनल बँक उपलब्ध करण्यात यावे. चिचडोह बँरेजचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाकरिता देण्यात यावे याचा नियोजन करण्यात यावा या संपूर्ण मागण्या निवेदनामार्फत युवा संकल्प यांनी चिमूर गडचिरोली खा.नामदेव किसान साहेब यांच्याकडे केले.

0/Post a Comment/Comments