*महिलांनी उद्योग व्यवसायात पुढे यावे* मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन


*महिलांनी उद्योग व्यवसायात पुढे यावे*
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

*अहेरी येथे महिला उद्योजक महामेळावा*

*अहेरी:* महिला प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पार करीत असून यशस्वी होत आहेत त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग,व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी  केले.
  ते शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी गाव माझा फाऊंडेशनच्या वतीने महिला उद्योजकता महामेळाव्यात स्थानिक  वासवी हॉल येथे उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
       महिला उद्योजक मेळाव्यात मंचावर उदघाटनस्थानी मंत्री ना . धर्मराव बाबा आत्राम तर अध्यक्षस्थानी  गाव माझा फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र बाबा आत्राम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहेरी, अष्टग्या वानखेडे सहसंचालिका गाव माझा फाउंडेशन , जयवंतजी बहादुरे अध्यक्ष जनरल मॅनेजर गाव माझा फाउंडेशन,या कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयीक कांता  बेडके ,राजकपूर भेडके पत्रकार तथा रिजनल मॅनेजर, पदाधिकारी भाग्यश्री मानके , लवकुमार शिंदे,शारदा शिंदे , भीमराव इंगळे, प्रीती इंगळे, किरण शेडमाके,सुनील  उसेंडी , सुरेंद्र अलोणे, रियाज शेख , पुष्पा अलोने लक्ष्मण येरावार ,नागेश मडावी  आदी मान्यवर  उपस्थित होते.
   पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, महिला ही जगाची जननी असल्याने महिला सक्षम होणे काळाची गरज असून आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम व बळकट व्हावे यासाठी सरकारचेही प्रयत्न असून खास महिलांसाठी लहान-मोठे उद्योग आपल्या भागात  स्थापित झाल्यास नक्कीच महिलांचे विकासाचे स्तर उंचावेल याकरिता गाव माझा फाऊंडेशन साठी जागेची उपलब्धता व सर्वोतोपरी मदत करण्याचे ग्वाही यावेळी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आणि मोलाचे मार्गदर्शन केले.
   अध्यक्षीय स्थानावरून गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे यांनी, महिला स्वबळावर व स्वाभिमानाने जगावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून  अहेरी उपविभागात उद्योग उभारण्यासाठी व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गाव माझा फाऊंडेशनचे व्हिजन व मिशन असल्याचे आवर्जुन सांगितले.
    कार्यक्रमाचे संचालन पूर्वा दोंतूलवार यांनी तर उपस्थितांचे आभार जयवंत बहाद्दूरे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments