*वडधम येथे होणार सुसज्ज गोडाऊनचे बांधकाम;मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न*


*वडधम येथे होणार सुसज्ज गोडाऊनचे बांधकाम;मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न*

सिरोंचा: तालुक्यातील वडधम परिसरातील शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 50 लाखांचा निधीतून सुसज्ज असे गोडाऊन बांधकाम केले जाणार असून नुकतेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते.धान उत्पादनात या तालुक्याने मोठी भरारी घेतली आहे.मात्र,या भागातील शेतकऱ्यांना धान्याचा साठवणूक करण्यासाठी गोडाऊन नसल्याने उघड्यावरच धान साठवून ठेवावे लागत आहे.अश्या परिस्थितीत पावसाळ्यात धानाची मोठी नासाडी होत आहे.त्यामुळे शासनाला देखील कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोडाऊन बांधमासाठी तब्बल 6 कोटी 50 लाखांची निधी खेचुन आणली.

काही दिवसांपूर्वी झिंगानुर येथेही गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. नुकतेच सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री आत्राम यांनी वडधम येथे धान्याचा गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन केले.यावेळी उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस. बरकमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार,उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला,नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,सतीश भोगे,सतीश राचर्लावार,रवी सुलतान,ओमप्रकाश ताटीकोंडावार,मलेश बट्टी,रवी सल्ला तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments