चौडमपल्ली येथील महाकाली मंदिरात नवरात्र उत्सवात संजय पंदिलवार यांच्या तर्फे भव्य महाप्रसादाचे वितरण


चौडमपल्ली येथील महाकाली मंदिरात नवरात्र उत्सवात संजय पंदिलवार यांच्या तर्फे भव्य महाप्रसादाचे वितरण

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

आष्टी
चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली गावाजवळील नवसाला पावणारी महाकाल्लीदेवी महाराष्ट्रात प्रख्यात आहे नवसाला पावणारी देवी म्हणून या ठिकाणी तेलंगणा पासून तर महाराष्ट्रातील अनेक भागातील भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन जातात. या महाकाली मंदिरात दरवर्षी प्रमाणे पंदिलवार घराण्याची परंपरा कायम ठेवत आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या तर्फे आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करुन उपस्थित हजारो भक्तांना महाप्ररसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मधुकर पंदिलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार,अमोल पंदिलवार,आयुष पंदिलवार, राॅयसिडाम,राजू चंदने, रमेश चुनारकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नागरिक थुटूजी गावडे, संजय बिस्वास यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी ठेवण्यात आलेल्या साबुदाणा खिचडी,शिरा, पिठलं प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला

0/Post a Comment/Comments