*भामरागड येथील जनसंवाद यात्रा ऐतिहासिक!* भामरागडात पहिल्यांदाच "ना भूतो....असा जनसमुदाय उसळला


*भामरागड येथील जनसंवाद यात्रा ऐतिहासिक!*
भामरागडात पहिल्यांदाच "ना भूतो....असा जनसमुदाय उसळला
*मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे जल्लोषात स्वागत*
शासनाचे विविध योजनेचे नागरिकांना लाभ
*भामरागड*:- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम आठवड्या भरापासून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात जनसंवाद व आढावा बैठक घेत असून गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी भामरागड येथील जनसंवाद यात्रा पहिल्यांदाच "ना भूतो... असा झाला. भामरागड येथे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच आदिवासी समाजाचे संस्कृती, परंपरा, रीतिरिवाजानुसार ढोल-ताशे वाद्यानी जंगी स्वागत करून शहरातून 'स्वागत रॅली' काढण्यात आले.
   जनसंवाद व आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम हे होते. तर मंचावर भामरागड तहसीलचे तहसीलदार किशोर बागडे, संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मकदुम, एसडीपीओ अमर मोहिते, भामरागड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिष धकाते, आरएफओ अमर भिसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष रमेश रामगोनवार, आदिवासी सेवक सबर बेग मोगल, सिताराम मडावी, डेव्हिड बोगी, रमेश बोलमपल्लीवार,लालसू आत्राम , इंदरशा मडावी, रामजी भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
     या प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी राज्यशासनाचे लोककल्याणकारी व लोकाभिमुख योजनेची माहिती देऊन , शेतकरी, कष्टकरी, महिला भगिनी, युवक-युवती , शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या हितासाठी धडाकेबाज निर्णय घेऊन शासन सर्व सामान्य नागरिकांच्या पाठीशी असल्याचे व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
    पुढे, मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी, भामरागड तालुक्याची निर्मिती मी केले असून विरोधक निव्वळ विकासाचे बाता करीत असले तरी, ते केवळ हवेत बोलणे व पोकळ आश्वासन असून काम करण्याची धमक व अनुभवाचा कस लागतो, असे म्हणत साडे चार वर्षे कुठे फिरकले नाही अशा निष्क्रिय व्यक्तींकडून काय अपेक्षा करायची ?असा खोचक सवाल करून विरोधकांवर यावेळी टीकेची झोड उडविली. विशेष म्हणजे मला जेंव्हा-जेंव्हा निवडून दिले तेंव्हा-तेंव्हा मी मंत्री बनलो असून या पुढेही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन मंत्री हमखास बनणार असा आशावाद बोलून दाखविताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
    त्या नंतर शासनाच्या लाडकी बहिण योजना, पुर पीडितांना धनादेश वितरण, जात प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, संजय गांधी निराधार योजना,घरकुल आवास योजना, शेतीच्या पीक उत्पादनासाठी औषध वाटप आदी व अन्य विविध योजनेचे वितरण मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.
    जनसंवाद यात्रेचे प्रास्ताविक माजी प्राचार्य रतन दुर्गे यांनी तर सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी केले. यावेळी फार मोठा जनसमुदाय उसळला होता.

*शेतीसाठी साहित्य वाटप!*
     आधुनिक पद्धतीने शेती करून पीक उत्पादन वाढावे यासाठी थ्रेशर मशीन , रोटावेटर, कल्टीवेटर, पंजी, पेरणी यंत्र ही आधुनिक साहित्य व अवजारे वाटप करण्यात आले.तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.

0/Post a Comment/Comments