*सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ प्रमुखांची बैठक संपन्न...!*



*सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ प्रमुखांची बैठक संपन्न...!*

 *तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वात बैठक आयोजन ...!* 


सिरोंचा :- महाराष्ट्र राज्यातील पुढच्या नाव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे सिरोंचा तालुक्यातील असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ प्रमुखांची बैठक देखील घेण्यात आली आहे,
         ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुका अध्यक्ष - सागर भाऊ मूलकला यांनी आयोजित करून तालुक्यातील ६९ बूथ प्रमुखांना बूथ प्रशिक्षण दिली आहे, त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवाराला निवळून आणण्यासाठी बूथ प्रमुखांनी आपापल्या बूथ केंद्रांमध्ये घरोघरी पक्षाचे विचारधारा, आणि पक्षांचे बोध चिन्ह - तुतारी वाजविणारा माणूस हा चिन्ह लोकांपर्यंत पोचावावे, आणि जास्तीत जास्त पक्षाचे सभासद नोंदणी करण्याची मार्गदर्शन अध्यक्ष मूलकला यांनी केली आहे,
                त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर भाऊ मूलकला, उपाध्यक्ष - मनोज कुम्मरी, अल्पसंख्यक आघाडीचे शहर अध्यक्ष - सलमान शेख आदी तालुक्यातील बूथ प्रमुखांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

0/Post a Comment/Comments