*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मोदुमडगु येथील अपघात ग्रस्त श्रीनिवास येलकुचीवार यांच्या कुटुंबाला दिला आधार.*


*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मोदुमडगु येथील अपघात ग्रस्त श्रीनिवास येलकुचीवार यांच्या कुटुंबाला दिला आधार.*

*उपचारासाठी केली ३५०००/- (पस्तीस हजार रुपये) आर्थिक मदत.!*

*अहेरी:-* तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोदुमडगु(आलापल्ली) येथील रहिवासी असलेले श्रीनिवास येलकुचीवार यांचा अपघात झाला,या अपघात मध्ये श्रीनिवास येलकुचीवार यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या त्यामुळे त्यांना चंद्रपूर येथील खाजगी कुबेर हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले.
त्यांच्या अन्ननलिकेमध्ये रक्त जमा झाले आहे त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया(Opration) करावं लागणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने शस्त्रक्रियाचा खर्च लाखो रुपयांच्या वर आहे.तो खर्च कसा करावा या चिंतेत संपूर्ण कुटूंब व्यथित होत.त्यांच्या कुटूंबात पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत.

ही येलकुचीवार कुटूंबाची व्यथा अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी तात्काळ येलकुचीवार कुटुंबातील सदस्यांना बोलावून त्यांची आस्थेने विचारणा केली,त्यांना आधार देत येलकुचीवार कुटूंबाला उपचारासाठी ३५०००/- (पस्तीस हजार रुपये) केली आर्थिक मदत केली.आपण पुन्हा सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन सुध्दा दिले.
त्यावेळी संपूर्ण येलकुचीवार कुटूंबाने राजे साहेबांचे हृदयातुन आभार मानले.!
यावेळी येलकुचीवार कुटुंबातील सदस्य गण आणि राजे समर्थक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments